खुशखबर! सणांच्या पार्श्वभूमीवर 200 स्पेशल ट्रेन धावणार

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 2 October 2020

भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 जास्तीच्या स्पेशल ट्रेनही सुरु केल्या आहेत, ज्यांना क्लोन ट्रेन (clone trains) नाव दिलं आहे.

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 15 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 200 विशेष रेल्वे (Special Trains) सुरु करण्याची योजना आखत आहे. यामुळे सणांच्या काळात प्रवास करणाऱ्यांची सोय होणार आहे. याबद्दलची माहिती रेल्वे बोर्डाचे  अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली आहे. यादव म्हणाले की, सणांच्या काळात भारतीय रेल्वे  (Indian Railways) 200 फेस्टिवल स्पेशल ट्रेन (festival special trains) सुरु करणार आहे. जर गरज पडली तर स्पेशल ट्रेनची संख्याही वाढवण्यात येईल, अशी माहितीही यादव यांनी दिली आहे. याबद्दलची बातमी न्यूज 18 ने दिली आहे.

भारतीय रेल्वेने 12 सप्टेंबरपासून 80 जास्तीच्या स्पेशल ट्रेनही सुरु केल्या आहेत, ज्यांना क्लोन ट्रेन (clone trains) नाव दिलं आहे. "आम्ही विविध झोनच्या महाव्यवस्थापकांची बैठक घेऊन कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संवाद साधला आहे. सध्या त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात येणार आहे, त्यानंतर सणांच्या काळात किती ट्रेन सुरु करायच्या हे ठरवलं जाणार आहे." असे यादव म्हणाले. 

वाचा सविस्तर- अजूनही गांधींवरच राग का?

राज्य सरकारांच्या गरजा आणि कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वेने दररोज प्रवासी सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दररोज रेल्वे, वाहतूक आणि कोरोनामधील परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. तसेच आवश्यक तेथे उपलब्ध करून दिल्या जातील, असं पुढे बोलताना व्ही. के. यादव म्हणाले.

क्लोन ट्रेनबद्दल बोलताना यादव म्हणाले की, यांची क्षमता सुमारे 60 टक्के आहे. जास्त गर्दीच्या मार्गावर या गाड्यांना चालवलं जात आहे. जिथं मोठी वेटींग लिस्ट असेल तिथं या क्लोन ट्रेन चालवल्या जातील. जर क्लोन ट्रेनही फुल झाली तर त्या मार्गावर आणखी एक क्लोन ट्रेन चालवली जाईल, जेणेकरून कोणताही प्रवासी  वेटिंगवर राहणार नाही.

वाचा सविस्तर-Gandhi Jayanti 2020: महिलांवरील अत्याचारावर काय म्हणाले होते गांधी?

सणांच्या काळात जास्त गजबजलेल्या मार्गावर एक किंवा दोन क्लोन ट्रेन चालवल्या जातील. रेल्वेने आतापर्यंत 40 क्लोन ट्रेनचं चालवल्या आहेत. तसेच दिवाळीच्या अगोदर देशात पहिली खाजगी ट्रेन 'तेजस' सुरु होऊ शकते. आयआरसीटीसीने (IRCTC) 17 ऑक्टोबरपासून तेजस ' ट्रेन सुरू करण्याची परवानगी मागितली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian railway will start new special trains from 15 october