

Indian Railway
Indian Railways launches Rail Tech Portal and e-RCT system : तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने दोन प्रमुख सुधारणा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी '५२ आठवड्यात ५२ सुधारणा' उपक्रमांतर्गत रेलटेक धोरण आणि ई-आरसीटी प्रणाली सुरू केली. या सुधारणांचा उद्देश रेल्वेमध्ये नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण क्लेम ट्रिब्यूनलच्या प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करणे आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी हे धोरण बनवण्यात आले आहे. ज्यामुळे सुरक्षा, देखरेख आणि प्रशासकीय कामांना गती मिळेल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले आहे.
नवीन रेलटेक धोरणांतर्गत, एक समर्पित रेलटेक पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे स्टार्टअप्स, नवोपक्रमक, उद्योग आणि संस्था थेट भारतीय रेल्वेशी जोडता येतील. आता, जबरदस्ता तांत्रिक कल्पना असलेले कोणीही डिजिटल पोर्टलद्वारे प्रस्ताव सादर करू शकतील. हे धोरणात नवोपक्रम निवड प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि प्रोटोटाइप विकास आणि चाचण्यांसाठी अनुदान वाढवले आहे. रेल्वे अशी अनेक क्षेत्रं निवडली आहेत जिथे नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
सुधारणा क्रमांक चारमध्ये रेल्वे क्लेम ट्रिब्यूनल (आरसीटी)चे संपूर्ण डिजिटलायझेशन करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रवाशांना आता अपघात किंवा इतर रेल्वे दाव्यांच्या बाबींसाठी न्यायाधिकरणाकडे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. पुढील १२ महिन्यांत देशभरातील २३ रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनल बेंच पूर्णपणे डिजिटायझेशन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
याआधी, खटला दाखल करणे, कागदपत्रे सादर करणे आणि सुनावणीला उपस्थित राहणे यासाठी ट्रिब्युनलकडे अनेकदा जावे लागत होते. मात्र नवीन डिजिटल प्रणालीमुळे प्रक्रियेचा वेळ, खर्च आणि गुंतागुंत कमी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.