IRCTC ALERT: आज रात्री साडेतीन तास बंद राहणार ऑनलाईन तिकीट बुकिंग

ऑनलाइन बुक केलेल्या रेल्वेच्या विविध सेवांवरही या काळात परिणाम होणार आहे.
Indian Train
Indian Train Esakal

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने तांत्रिक देखभालीसाठी (Maintenance ) प्रवासी आरक्षण (Railway Ticket Booking) प्रणाली तात्पुरती बंद करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय ऑनलाइन बुक केलेल्या रेल्वेच्या विविध सेवांवरही या काळात परिणाम होणार आहे. आज रात्री सुमारे साडेतीन तास ऑनलाईन रेल्वे बुकिंगसेवांसह इतर काही सुविधा या काळात बंद राहणार आहेत. त्यामुळे तिकिट बुकिंग करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याबाबत न्यूज 18 हिंदीने वृत्त प्रकाशित केले आहे. (IRCTC Booking News)

Indian Train
Video : कोंढव्यात गोडाऊनला भीषण आग; नियंत्रणाचे प्रयत्न सुरू

प्रकाशित वृत्तानुसार, प्रवासी आरक्षण प्रणाली बंद असल्यामुळे पूर्व रेल्वे, दक्षिण पूर्व रेल्वे, पूर्व तटीय रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, उत्तर पूर्व सीमावर्ती भागातील रेल्वे बुकिंगसह रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरवरून होणाऱ्या बुकिंगवरही याचा परिणाम होणार आहे. या काळात तिकीटही रद्द केले जाणार नसून, रात्री 12 नंतर सुरू होणाऱ्या गाड्यांचे तक्तेही वेळेआधी तयार केले जाणार आहेत.

Indian Train
प्रशांत किशोरांनी काँग्रेसची ऑफर नाकारली; ''नेतृत्वाचा प्रश्न आधी सोडवा''

रात्री 11.45 ते 2.30 पर्यंत सेवा बंद राहणार

रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, 26 एप्रिल रोजी रात्री 11.45 वाजल्यापासून कोलकाता येथील रेल्वे डेटा सेंटरमध्ये देखभालीचे काम केले जाणार आहे. जे मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या काळात रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. यादरम्यान रेल्वे प्रवासी तिकीट काउंटरवरूनही बुकिंग करू शकणार नाहीत.

या सेवांवरही होणार परिणाम

देखभालीच्या कामामुळे रेल्वे प्रवाशांना ऑनलाइन चौकशी, रिटायरिंग रूम सर्व्हिसचे बुकिंग करता येणार नाहीये. याशिवाय ट्रेनशी संबंधित माहिती कॉल सेंटर आणि दूरध्वनी क्रमांक-139 द्वारे देखील उपलब्ध होणार नाही. यावेळी रेल्वे प्रवाशांना IVRS, टच स्क्रीनच्या माध्यमातून कोणतीही माहिती मिळू शकणार नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com