

भारतीय रेल्वे (Indian Railway)विभागाने काही रेल्वे गाड्या एक डिसेंबर ते दोन मार्च पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महानंदा एक्सप्रेस आणि बांद्रा एक्सप्रेससह वीस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आला आहे. दिल्लीत पडलेली प्रचंड थंडी आणि धुके यामुळे हा निर्णय भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशने (Indian Railways IRCTC)घेतला आहे. नेमक्या कोणत्या रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत व कोणत्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे हे घ्या जाणून.
दाट धुके आणि पडलेली थंडी यामुळे रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवणे मुश्किल आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लाॅकडाऊन नंतर नुकतीच सुरु झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा काही काळासाठी विस्कळीत होणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रद्द केलेल्या रेल्वे गाड्याचे वेळापत्रक असे
महानंदा एक्सप्रेस (05483-05484) –एक डिसेंबर ते दोन मार्च पर्यंत
अजमेर सियालदह एक्सप्रेस (02987-02988) –एक डिसेंबर ते दोन मार्च पर्यंत
गोरखपुर एक्सप्रेस (02595-02596) –दोन डिसेंबर ते एक मार्च पर्यंत
कासगंज एक्सप्रेस (05039-05040) –एक डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंत
छपरा-फर्रुखाबाद एक्सप्रेस (05083-05084) –दोन डिसेंबर ते दोन मार्च पर्यंत
बांद्रा एक्सप्रेस (05067-5068) – एक डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंत
छपरा-मथुरा एक्सप्रेस (05117-05118) –एक डिसेंबर ते 28 फेब्रुवारी पर्यंत
लिच्छवी एक्सप्रेस (04005-04006) – एक डिसेंबर ते दोन मार्च पर्यंत
ऊंचाहार एक्सप्रेस (04217-04218) – एक डिसेंबर ते एक मार्च पर्यंत
उज्जैन एक्सप्रेस (04309-04310) – दोन डिसेंबर ते 24 फेब्रुवारी पर्यंत
या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात झाला बदल
आनंदविहार एक्सप्रेस (02549) एक डिसेंबर ते 27 फेब्रुवारी पर्यंत मुळ स्टेशन पासून बुधवार, शुक्रवार आणि रविवार बंद असेल
आनंद विहार एक्सप्रेस (02550) तीन डिसेंबर ते एक मार्च पर्यंत मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी मुख्य स्टेशन पासून बंद
भागलपुर एक्सप्रेस (02367) 30 नोव्हेंबर ते 24 फेब्रुवारी पर्यंत मंगळवार आणि गुरुवारी मुख्य स्टेशन पासून बंद
भागलपुर एक्सप्रेस (02368) एक डिसेंबर ते 25 फेब्रुवारी पर्यंत मुख्य स्टेशन पासून बुधवार, शुक्रवार पासून बंद राहिल
आनंद विहार एक्सप्रेस (04412) एक डिसेंबर ते 23 फेब्रुवारी पर्यंत बुधवार पासून बंद असेल
आनंद विहार एक्सप्रेस (04411) दोन डिसेंबर ते 24 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक गुरुवारी बंद राहील.
मऊ एक्सप्रेस (05025) सात डिसेंबर ते 22 फेब्रुवारी या दरम्यान मंगळवा पासून मुख्य स्टेशन पासून बंद राहील.
मऊ एक्सप्रेस (05026) 10 डिसेंबर ते 22 फेब्रुवारी या दरम्यान शुक्रवार पासून मुख्य स्टेशन पासून बंद राहील.
दुर्ग एक्सप्रेस (05159) एक डिसेंबर ते 27 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक बुधवार, शुक्रवार आणि रविवारी मुख्य स्टेशन पासून बंद राहील.
टीप : या गाड्यांसोबत 05160, 02571, 02572, 02226 आणि 02225 यांचे शेड्यूल बदलण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.