Indian Railways strike

Loco pilots protesting for regulated duty hours

esakal

Railway Loco Pilot Demands : इंडिगो प्रमाणे भारतीय रेल्वे देखील ठप्प होणार? लोको पायलट्सच्या 'या' मागणीने प्रवाशांची चिंता वाढली

Indian Railways strike : सरकारने विमान वाहतूक क्षेत्रात कडक FRMS नियम लागू केले पण रेल्वेत अजून लागू केले नाहीत असा संघटनेचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची शक्यता असून त्याचा थेट परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर, रद्दीकरणांवर होऊ शकतो.
Published on

Loco Pilot Strike: देशातील हवाई इतिहासात पहिल्यांदाच इंडिगोच्या गोंधळामुळे सर्वात मोठे संकट निर्माण झाले आहे. रद्द किंवा विलंबाने झालेली उड्डाणे यामुळे हजारो प्रवासी अनेक दिवस अडकून पडले. यामुळे अभूतपूर्व गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अशातच आता रेल्वेबाबतही अशीच गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकोपायलट कामाचे तास निश्चित करण्याची मागणी करत आहेत. पुरेसा आराम न मिळाल्याने थकवा निर्माण होतो आणि अशा स्थितीत गाड्या चालवाव्या लागतात, यामुळे अपघातांचा धोका वाढतो असे त्यांचे म्हणणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com