Indian Railways New Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! तिकीट अन् 'कोच'च्या नियमात केले महत्त्वपूर्ण बदल

Indian Railways Announces Major Ticket Rule Changes : वंदे भारत ट्रेनने प्रवास करण्याआधी एकदा ही बातमी आवश्य वाचा
 Vande Bharat

Vande Bharat

sakal

Updated on

Indian Railway announces major changes in train ticket rules and coach allocation : रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेने त्यांच्या तिकीट आणि कोच नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रेल्वेने स्पष्ट केले आहे की निवडक श्रेणीतील  रेल्वेंमध्ये आरएसी सीटची व्यवस्था पूर्णपणे रद्द केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांना अर्ध्या सीटवर प्रवास करण्याची मजबूरी राहणार नाही. कारण, आता रेल्वेने वंदे भारत (स्लीपर) ट्रेनमध्ये आरएसी तिकीट पूर्णपणे रद्द केले आहे.

९ जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात, रेल्वे बोर्डाने म्हटले आहे की वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठी किमान भाडे ४०० किमी असेल. या ट्रेनसाठी फक्त कन्फर्म तिकिटेच दिली जातील. त्यामुळे, आरएसी/वेटींग लिस्टमधील/अंशतः कन्फर्म तिकिटांसाठी कोणतीही तरतूद राहणार नाही.

सर्व उपलब्ध बर्थ, अॅडव्हान्स रिझर्वेशन कालावधीच्या तारखेपासून उपलब्ध असतील. नवीन नियमांनुसार, स्लीपर क्लाससाठी किमान २०० किमीचे भाडे लागेल, जे १४९ रुपये आहे. तर द्वितीय श्रेणीसाठी  किमान भाडे ५० किमीचे  असेल, जे ३६ रुपये निश्चित करण्यात आले आहे.

 Vande Bharat
Lonikand ST Bus Attack Video : लोणीकंदला भररस्त्यात एसटी बसवर हल्ला! लोखंडी रॉडने काच फोडली, दगडही फेकले; प्रवाशांची आरडाओरड, व्हिडिओ व्हायरल

आरक्षण शुल्क आणि सुपरफास्ट शुल्क वेगळे आकारले जाईल. जरी एखादा प्रवासी फक्त १०० किमी प्रवास करत असला तरी,  त्याला स्लीपर क्लासमध्ये किमान २०० किमीचे भाडे द्यावे लागेल. शिवाय, स्लीपर क्लासमध्ये फक्त तीन श्रेणीतील कोटा उपलब्ध असेल. महिला, अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक. या ट्रेनमध्ये अन्य कोणताही कोटा लागू होणार नाही.

 Vande Bharat
Vinod Tawde News : भाजप अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच नितीन नवीन यांचा निर्णय; विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी!

रेल्वे बोर्डाने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसह प्रवास करणाऱ्यांसाठी लोअर बर्थ सुरू केला आहे. ही प्रणाली ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना आणि ४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना लोअर बर्थ देण्याचा प्रयत्न करेल. बर्थ वाटप उपलब्धतेवर आधारित असेल. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार वर्मा म्हणाले की हे नियम दिल्ली रेल्वे बोर्डाने जारी केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com