

Loni Kand ST bus attack
esakal
ST Bus Attack in Lonikand : पुणे–अहिल्यानगर रोडवर लोणीकंद येथे भररस्त्यात एस.टी. बस अडवून तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रस्त्यावर कट मारल्याच्या रागातून MH-12 SX-4491 या टेम्पो वरील चालक आनंद विनोद पवार (वय १९, रा. लोणीकंद) याने एस.टी. बसला टेम्पो आडवा लावून बस अडवली. त्यानंतर एस.टी. बसच्या उजव्या बाजूचा आरसा हाताने तोडला
एवढ्यावरच न थांबता टेम्पोमधून लोखंडी पाईप काढून बसच्या समोरील काचेवर मारून काच फोडली. तसेच रस्त्याच्या कडेला असलेला दगड उचलून काचेवर मारून ती पूर्णपणे फोडण्यात आली. या घटनेत तक्रारदाराच्या हातातील मोबाईलही फोडण्यात आला असून एस.टी. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.