

Indian Railways Introduces New Fare Rules RAC Closed For Amrit Bharat 2 Express
Esakal
भारतीय रेल्वेनं जानेवारी २०२६ पासून अमृत भारत २ एक्सप्रेस ट्रेनची सुरुवात करण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वे बोर्डाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. नव्या रेल्वे गाड्यांची भाडे रचना आणि बूकिंगची नियमावली आधीच्या अमृत भारत रेल्वे गाड्यांपेक्षा वेगळी असणार आहे. नव्या नियमानुसार मुलभूत भाड्यामध्ये बदल केला जाणार नाही. पण किमान अंतरासाठी नवे नियम लागू केले आहेत.