Indian Railways Smart Toilet
esakal
Indian Railways: रेल्वे प्रवासादरम्यान अस्वच्छ टॉयलेट ही सर्वात मोठी समस्या आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही ही समस्या प्रकर्षाने जाणवते. यासाठी रेल्वेने वेळोवेळी अनेक उपाय योजनाही केल्या आहेत. पण, त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र, आता रेल्वेने या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वेद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे. या नव्या तंत्रज्ञानाद्वारे रेल्वेतील टॉयलेट ५६ सेकंदात साफ होतील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.