भारतीय रेल्वेनं बनवलं 'हे' अनोखं इंजिन, जाणून घ्या खासियत

भारतीय रेल्वेनं बनवलं 'हे' अनोखं इंजिन, जाणून घ्या खासियत

मुंबई- भारतीय रेल्वेनं बॅटरीवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची निर्मिती केली आहे. रेल्वेनं या इंजिनला नवदूत असं नावं दिलं आहे. बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनच्या निमिर्तीमुळे भारतीय रेल्वेनं एका नव्या युगात पाऊल ठेवलं आहे.  हे इंजिन पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागात बनवले गेले आहे.  हे इंजिन बॅटरीवर चालते तसंच त्याची पहिली चाचणी यशस्वी झालीय. अशा प्रकारचे पहिलंच इंजिन भारतात बनलं असल्यानं हे इंजिन रेल्वेमध्ये एक मोठं यश म्हणून पाहिले जात आहे.

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्विटसोबत त्यांनी  एक व्हिडिओही शेअर केला आहे. रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत हिरव्या रंगाचं इंजिन ट्रेन चालताना दिसत आहे. या इंजिनचं वैशिष्ट्ये म्हणजे हे इंजिन पूर्णपणे बॅटरीवर चालतं. या इंजिनचा वापर हा शंटिंगसाठी केला जाणार आहे. तसंच या इंजिनमध्ये ड्युअल मोडची सुविधाही उपलब्ध आहे. म्हणजेच इंजिन दोन्ही बाजूने चालवण्याची सुविधा उपलब्ध आहे.

रेल्वेसाठी हा एक उज्ज्वल भवितव्याचं संकेत आहे असे पियूष गोयल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'नवदूत' या बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. या इंजिनामुळे डिझेल विकत घेण्यासाठी खर्च होणारे परकीय चलन वाचेल तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठी देखील याचा खूप मोठा उपयोग होईल, असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

२०३० पर्यंत रेल्वेने 'नेट जीरो कार्बन एमिशन नेटवर्क' तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.  हे या दिशेने एक मोठे पाऊल देखील मानले जाते. पश्चिम मध्य रेल्वेने जबलपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर एक विशेष यंत्रणा बसविली आहे. त्याअंतर्गत  स्टेशनवर जर ट्रेन नसेल तर स्टेशनवरील ७० टक्के लाईट्स आपोआप बंद होतील आणि केवळ ३० टक्के लाईट्स सुरू राहतील. 

असं आहे नवदूत इंजिन 

हे 'नवदूत' इंजिन, शंटिंग प्रकारातले असून याचा उपयोग एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी होणार नाही आहे.  यार्डमधून ट्रेन स्टेशनवर आणण्यासाठी आणि स्टेशनवरून रिकाम्या ट्रेन यार्डमध्ये नेण्यासाठी या इंजिनचा उपयोग होणार आहे.  या कामासाठी सध्या डब्ल्यू डी एस 6, डब्ल्यू डी एस 6 AD अशा डिझेलवर चालणाऱ्या इंजिनांचा वापर करण्यात येतो.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. मात्र या नवीन इंजिनामध्ये उच्च क्षमता असलेल्या बॅटरीचा वापर केल्याने डिझेल खर्च न होता,  तसेच जिथे विद्युत पुरवठा नाही अशा रेल्वे मार्गांवर देखील या इंजिनाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे डिझेल आणि वीज या दोन्हीची बचत होईल.

नवदूत इंजिनची क्षमता 

पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागातील, कटनी इलेक्ट्रिक लोको शेड मध्ये, इलेक्ट्रिक इंजिनियर्सने या इंजिनाची निर्मिती केली आहे.  या इंजिनची क्षमता 1200 हॉर्सपॉवर असून त्याचं वजन 180 टन इतके आहे. या इंजिनची लांबी 35 मीटर इतकी आहे. इंजिनाचा जास्तीत जास्त वेग 100 किलोमीटर प्रतितास असून तो 120 किलोमीटर प्रति तास इतका वाढवण्यात येऊ शकतो. 

हे इंजिन पूर्णतः एसी ट्रॅक्शनवर चालेल. नवदूत या इंजिनची चाचणी यशस्वी झाली असली तरी अशाच प्रकारचे आणखीन एक इंजिन कोटा इथे देखील बनवण्यात येत आहे. 

सध्या भारतीय रेल्वे सौर ऊर्जेसह गाड्या चालवण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वेनं या दिशेनं एक मोठा प्रयोग केला आहे. रेल्वेने पथदर्शी प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील बीना येथे सौर उर्जा प्रकल्प सुरू केला आहे. रिक्त रेल्वेच्या जागेवर हा प्रकल्प बसविण्यात आला आहे.

Indian Railways test trial train battery engine navdoot successful

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com