हनी ट्रॅप : आयएसआयला गुप्तचर माहिती देणाऱ्या भारतीय जवानाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian soldier arrested for providing intelligence to ISI

Honey Trap : पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या भारतीय जवानाला अटक

हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर लष्कराची गुप्त कागदपत्रे आयएसआयच्या गुप्तहेराकडे सोपवल्याप्रकरणी लष्कराच्या जवानाला अटक (Indian soldier arrested) करण्यात आली आहे. प्रदीप कुमार (२४) असे आरोपी जवानाचे नाव आहे. त्याला राजस्थान पोलिसांनी २१ मे रोजी अटक केली आहे. प्रदीप कुमारवर लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे पाकिस्तानी महिला गुप्तहेराला दिल्याचा आरोप आहे. (Indian soldier arrested for providing intelligence to ISI)

मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील पोस्टिंगदरम्यान प्रदीप कुमारची फेसबुकवर पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी मैत्री (Honey Trap) झाली. या महिलेने फेसबुकवर हिंदू तरुणी चदमच्या नावाने आयडी बनवला होता. गुप्तहेराने प्रदीपला सांगितले की, ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरची असून, बंगळूरमधील कंपनीत काम करते. महिलेशी अनेक महिन्यांच्या मैत्रीनंतर प्रदीप कुमार लग्नाच्या बहाण्याने दिल्लीत आला आणि लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे दिली.

हेही वाचा: वसुंधरा राजेंना मोठा झटका! राजस्थान भाजप प्रमुखांनी केली ही घोषणा

प्रदीप कुमारने इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंससाठी (ISI) काम करणाऱ्या पाकिस्तानी महिलेला लष्करी आणि सामरिक महत्त्वाशी संबंधित गोपनीय माहिती आणि छायाचित्रे पाठवली होती. प्रदीप कुमार आणि पाकिस्तानी गुप्तहेर सहा महिन्यांपासून व्हॉट्सॲपवर एकमेकांच्या संपर्कात होते, असे अशी माहिती पोलिसांनी दिली.

संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते

प्रदीप कुमारने पाक एजंटला व्हॉट्सॲपद्वारे अनेक गुप्त कागदपत्रे पाठवली. ज्यामुळे युनिटच्या उर्वरित सैनिकांची सुरक्षा धोक्यात आली. या गुन्ह्यात कुमारच्या आणखी एका महिला मैत्रिणीचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. कुमारला राजस्थान पोलिसांनी १८ मे रोजी हेरगिरीच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. शनिवारी (ता. २१) अटक (Indian soldier arrested) करण्यात आली, असे डीजी इंटेलिजेंस उमेश मिश्रा यांनी सांगितले.

Web Title: Indian Soldier Arrested For Providing Intelligence To Isi Honey Trap Rajasthan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top