हरभजनसिंगचा काँग्रेसमध्ये प्रवेश?

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू यांच्यापाठोपाठ आता ऑफस्पिनर हरभजनसिंगने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरभजनसिंग आज (गुरुवार) काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच तो जलंधर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंह आणि हरभजनसिंग यांची सहा महिन्यांपूर्वी भेट झाली होती. त्यावेळीच हरभजन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

अखेर आता पंजाबमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरभजनच्या प्रवेशाची शक्यता आहे. अमरिंदर सिंग यांनी हरभजनचे पक्षात स्वागत असल्याचे म्हटले आहे. नवज्योतसिंह सिद्धूने भाजपला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी नुकतीच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. 

Web Title: indian spinner harbhajan singh may join congress and contest election from jalandhar