esakal | लसीकरणामध्ये प्रगत राष्ट्रांपेक्षाही पुढे आहेत भारतातील 'ही' राज्ये
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

लसीकरणामध्ये प्रगत राष्ट्रांपेक्षाही पुढे आहेत भारतातील 'ही' राज्ये

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट जगावर घोंघावत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाशी दोन हात करण्यासाठी परिणामकारक असं औषध अद्यापही उपलब्ध झालं नाहीये. मात्र, सध्या अनेक देशांनी विविध लसी उपलब्ध केल्याने लसीकरणाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही, अमेरिकेची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस तसेच झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी या लसींना मान्यता मिळाली आहे. यातील जॉन्सनची लस सिंगल डोस तर झायडस कॅडिलाची लस तीन डोसची आहे. देशात 16 जानेवारीपासून सुरु असलेली लसीकरणाची ही मोहिम वेगाने सुरु आहे. तिचा वेग इतका आहे की, भारतातल्या अनेक राज्यांनी इतर प्रगत राष्ट्रांनाही मागे टाकलं आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

हेही वाचा: केंद्र सरकार मतांसाठी अफगाणिस्तान मुद्द्याचाही वापर करेल - काँग्रेस

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि हरयाणात सर्वाधिक लसीकरण होत आहे. ही आकडेवारी सप्टेंबर महिन्यातील आहे. या महिन्यात प्रत्येक दिवसाला देण्यात येणाऱ्या लसींची तुलना इतर देशांशी केली गेली आहे. या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश राज्यात सरासरी एका दिवसांत अमेरिकेपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये दिवसाला ११.७३ लाख तर अमेरिकेत ८.०७ लाख इतकं प्रमाण आहे. गुजरातने मेक्सिकोच्या पुढे बाजी मारली आहे. गुजरातमध्ये दिवसाला ४.८० लाख, तर मेक्सिकोमध्ये ४.५६ लाख लसी दिल्या गेल्या आहेत. कर्नाटक आणि रशियाच्या तुलनेमध्ये रशियात दिवसाला २.८४ लाख लसी तर कर्नाटकात ३.८२ लाख लसी दिल्या गेल्या आहेत. मध्य प्रदेश आणि फ्रान्सच्या तुलनेमध्ये मध्य प्रदेशात ३.७१ लाख तर फ्रान्समध्ये २.८४ लाख लसी दिल्या गेल्या आहेत. हरयाणा आणि कॅनडाची तुलना केल्यास हरयाणात १.५२ लाख लसी, तर कॅनडात ०.८५ लाख लसी दिल्या गेल्यात.

हेही वाचा: ‘जिओफोन नेक्स्ट’साठी दिवाळीपर्यंत प्रतीक्षा; गणेश चतुर्थीचा मुहूर्त का टळला?

भारतात गेल्या २४ तासात नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलं. गुरुवारी दिवसभरात ३४ हजार ९७३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. बुधवारच्या तुलनेत ७.७ टक्के कमी रुग्णांची नोंद गुरुवारी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. तर दिवसभरात २६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ कोटी १७ लाख ४९ हजार ९५४ इतकी झाली आहे. देशात सध्या ३ लाख ९० हजार ६४६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.

loading image
go to top