भारतीय विद्यार्थ्यावर पोलंडमध्ये हल्ला 

वृत्तसंस्था
शनिवार, 1 एप्रिल 2017

अमित अग्निहोत्री नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला असून यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला होता. यानंतर सुषमा स्वराज यांनी तात्काळ पोलंडमधील भारतीय राजदूत अजय बिसारिया यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला.

नवी दिल्ली - पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. 

तेथील स्थानिक माध्यमांनी या हल्ल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी तातडीने तेथील भारतीय राजदूताशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती देण्याचे निर्देश दिले. पोझनानमधील बाजारपेठेत या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे.

अमित अग्निहोत्री नावाच्या एका व्यक्तीने ट्विट करत पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला झाला असून यामध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला होता. यानंतर सुषमा स्वराज यांनी तात्काळ पोलंडमधील भारतीय राजदूत अजय बिसारिया यांच्याकडून सविस्तर अहवाल मागविला. सुषमा स्वराज यांनी ट्विट करत, 'पोलंडमध्ये मारहाणीची घटना घडली असून सुदैवाने तरुण बचावला आहे. आम्ही या घटनेची सविस्तर चौकशी करत असल्याचे सांगितले.

Web Title: Indian Student Attacked In Poland, Sushma Swaraj Seeks Report