चीनची हवाई घुसखोरी रोखण्यासाठी नवी क्षेपणास्त्रप्रणाली तैनात

पीटीआय
Wednesday, 26 August 2020

चीनच्या शिनजियांग प्रांतातील होतान, गुन्सा, काशघर, हॉप्पींग, डोकांका, डेझाँग, लिनझी आणि पँगट येथील हवाई तळांवर भारत बारकाईने नजर ठेवून आहे. तिबेटमधील चीनच्या हालचालींवर देखील भारताचे लक्ष आहे.

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्ये चीनकडून वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारतानेही सीमेवरील लष्करी बळ आणखी वाढवायला सुरुवात केली आहे. येथील पर्वत रांगांमध्ये रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या ठिकाणांवर खांद्यावरून हवेत क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असणाऱ्या तुकड्यांना तैनात करण्यात आले आहे. 

भारतीय जवानांकडे रशियन बनाटीची ‘इग्ला एअर डिफेन्स सिस्टिम’ देण्यात आली आहे. भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करण्याचा खोडसाळपणा करणाऱ्या शत्रू राष्ट्रांच्या विमानांना धडा शिकवण्याचे काम आपले जवान करतील असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  विशेष म्हणजे भारताचे लष्कर आणि नौदल या दोघांकडून  या रशियन क्षेपणास्त्र प्रणालीचा आधीपासूनच वापर करण्यात येतो. आणीबाणीच्या प्रसंगी शत्रू राष्ट्राचे हेलिकॉप्टर अथवा विमान आपल्या हद्दीत आले तर त्याला  या माध्यमातून टिपता येते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चीनच्या आकाशातील हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी भारताने रडार यंत्रणा आणि हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीचा आधार घ्यायला सुरवात केली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोरे आणि टेहळणी चौकी क्रः १४च्या हद्दीमध्ये चिनी लष्कराची हेलिकॉप्टरे सातत्याने घुसखोरी करत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय हवाई दलाने या भागामध्ये ‘सुखोई-३० एमकेआय’ ही विमान मेच्या पहिल्या आठवड्यातच या भागांमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला होता.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्हणून सावधगिरी
शिनजियांग प्रांतातील लिनझी हे हवाईतळ रणनितीकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते, या भागामध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणावर हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे. अन्य  हवाईतळांच्या बाबतीत चीन हीच भूमिका घेण्याची शक्यता असल्याने भारतीय सुरक्षा दले सावध झाली आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या तळांवर लक्ष
चीनच्या शिनजियांग प्रांतातील होतान, गुन्सा, काशघर, हॉप्पींग, डोकांका, डेझाँग, लिनझी आणि पँगट येथील हवाई तळांवर भारत बारकाईने नजर ठेवून आहे. तिबेटमधील चीनच्या हालचालींवर देखील भारताचे लक्ष आहे. चीनने सीमावर्ती भागांतील अनेक हवाई तळांचे आधुनिकीकरण केले असून या भागांतील रस्ते बांधणीलाही गती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian troops air defence missiles deployed near China border