
इराण इस्रायल यांच्यातलं १२ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध अखेर थांबलं आहे. मात्र दोन्ही देशांनी एकमेकांवर केलेल्या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालं आहे. परदेशातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, नोकरीसाठी आलेले नागरिक अडकून पडले आहे. त्यांच्यात भीतीचं वातावरण आहे. भारताकडून भारतीय नागरिकांसाठी ऑपरेशन सिंधू राबवलं जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचे दोन विद्यार्थी अजूनही तिथंच थांबले आहेत.