atal bihari vajpayee
atal bihari vajpayeeatal bihari vajpayee

Ukraine : भारतीय करताहेत अटलबिहारी वाजपेयींची आठवण; म्हणताहेत...

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे पाकिस्तान व चीनसारख्या शेजारी राष्ट्रांमुळे भारतीय देखील मंथन करीत आहेत. सोशल मीडियावर #nuclearwar ट्रेंड करीत आहे. त्यामुळे भारतीय अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) व इंदिरा गांधी यांना मिस करीत आहेत. चला तर जाणून घेऊया यामागील कारण...

कारगिलमध्ये युद्ध सुरू झाले होते. अमेरिकेच्या व्हाईट हाउसमधून भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांना फोन आला. राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी फोनवर सांगितले की, त्यांना नवाझ शरीफ यांनी सांगितले आहे की त्यांना भीती वाटते की पाकिस्तानचे सैन्य अणुबॉम्ब वापरू शकते. तेव्हा वाजपेयींनी जे सांगितले ते ऐकून पाकिस्तानच नाही तर अमेरिकाही थक्क झाला होता. तेव्हा वाजपेयींनी क्लिंटन यांना फोनवर सांगितले होते, ‘पाकिस्तानला अणुबॉम्ब वापरू द्या... पण मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की पाकिस्तान उद्याचा सूर्य पाहू शकणार नाही.’ दोन दशकांपूर्वीच्या अटलबिहारी वाजपेयींच्या त्या ‘अटल ओळी’ आजही भारतीयांच्या मनात अभिमानाने भरून येतात.

atal bihari vajpayee
Ukraine : वरुण गांधींचा घरचा अहेर; सरकारला करून दिली आठवण

आजच्या काळात सामर्थ्यशाली देश होण्यासाठी अणुऊर्जा हा एक मोठा उपाय आहे. अमेरिका, रशिया, भारतासह जगातील मोजक्याच देशांकडे अणुशक्ती आहे. अशा परिस्थितीत आज भारतीय त्या महान व्यक्तींना नतमस्तक होत आहेत ज्यांनी भारताला इतके सामर्थ्यवान बनवले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन अण्वस्त्र दलांना (Nuclear attack) ‘हाय अलर्ट’ राहण्याचे आदेश दिले आहे. यामुळे हा विषय चर्चेला जात आहे.

अण्वस्त्राची शक्तीच शत्रूला भारतावर वाईट नजर टाकण्यापासून रोखते. भारताकडे जगातील सर्वांत मोठे विध्वंसक शस्त्र आहे. ज्याला जग अण्वस्त्रे म्हणतो. हे पाकिस्तान आणि चीन या दोघांनाही माहीत आहे. भारतही त्याचा वापर शांततापूर्ण हेतूंसाठीच करेल यावर ठाम आहे. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून देशातील लोक सोशल मीडियावर अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी केल्याची घोषणा करतानाचा व्हिडिओ पाहत आहेत.

...तर युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण झाली असती

वाजपेयींनी जेव्हा यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तेव्हा जगातील देश थक्क झाले होते. अमेरिका सर्व निर्बंधांच्या धमक्या देत होती पण भारताचे अटळ (Atal Bihari Vajpayee) इरादे ते रोखू शकले नाहीत. अटलजींचा तो धाडसी निर्णय आज लोकांना आठवत आहे. लोकांचे म्हणणे आहे की, आज जर भारत अण्वस्त्र झाला नसता तर कदाचित युक्रेनसारखी परिस्थिती निर्माण झाली असती.

atal bihari vajpayee
भारताला मानवी जीवनाचे नुकसान मान्य नाही; भूमिका केली स्पष्ट

जगाला करून दिली भारताच्या सामर्थ्याची जाणीव

भारताच्या अणुऊर्जेमागे अटल-इंदिरांच्या (Indira Gandhi) प्रबळ इच्छाशक्तीसोबतच होमी जहागीर भाभा, विक्रम साराभाई, एपीजे अब्दुल कलाम यांनाही लोक श्रद्धांजली वाहतात. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमानंतर १८ मे १९७४ रोजी देशाने पहिल्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. ते ठिकाण पोखरण टेस्ट रेंज होते. पुढे १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुचाचण्या करून पुन्हा एकदा जगाला भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.

युक्रेनचे सार्वभौमत्व पायदळी तुडवले

रशियाने (Russia) बेफिकीरपणे युक्रेनच्या भूमीवर पाऊल ठेवल्याने जगभरात दहशत निर्माण झाली आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, युक्रेनने मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे सोडली. परंतु, अमेरिका-रशियासह अनेक देशांनी एकत्रितपणे १९९४ मध्ये बुडापेस्ट मेमोरँडममध्ये युक्रेनला सहमती दिली. याअंतर्गत युक्रेनने आपली अण्वस्त्रे, बॉम्बर आणि क्षेपणास्त्रे रशियाला नष्ट करण्याचे किंवा देण्याचे मान्य केले. २८ वर्षांनंतर ही त्यांच्यासाठी मोठी चूक असल्याचे युक्रेनला समजले. त्यावेळी युक्रेनला आश्वासन देण्यात आले की, रशिया, अमेरिका आणि ब्रिटन त्यांच्यावर हल्ला करणार नाही. परंतु, आज काय परिस्थिती आहे. युक्रेनचे सार्वभौमत्व पायदळी तुडवले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com