
नवी दिल्ली : देशाच्या आठव्या जनगणनेच्या तयारीस सुरुवात झाली असून त्याचा भाग म्हणून एक एप्रिल २०२६ पासून घरांची यादी बनविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची यादी बनवली जात असतानाच घराची स्थिती, सुखसुविधेच्या वस्तू, घरात विवाहित जोडपी किती अशा प्रकारच्या सुमारे तीन डझन प्रश्नांची माहिती नागरिकांना या टप्प्यात द्यावी लागणार आहे.