जाधव यांच्या सुनावणीबाबतच्या तपशिलाची भारताची मागणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नवी दिल्ली: निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याविरुद्धच्या खटल्याच्या सुनावणीचे सारे तपशील देण्याची मागणी भारताने आज अधिकृतपणे पाकिस्तानकडे केली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी आव्हान देण्याची पद्धत सांगावी, अशीही मागणी पाकिस्तानकडे करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

याबाबत बोलताना मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले म्हणाले, ""कुलभूषण जाधव यांना वकिलांची मदत व भेट घेऊ द्यावी, अशी मागणी भारताने पंधराव्यांदा केली आहे. भारताच्या या विनंतीला आतापर्यंत पाकिस्तानने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.'' हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेली आहे.

बागले म्हणाले, ""वकिलांची मदत व जाधव यांच्यावरील खटल्याच्या सुनावणीचा तपशील या भारताच्या दोन मागण्यांबाबत पाकिस्तानच्या अधिकृत प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत. जाधव यांच्या पाकिस्तानातील ठावठिकाणाबद्दल त्याचप्रमाणे त्यांच्या प्रकृतीबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. भारताच्या दृष्टीने ही गंभीर काळजीची बाब बनलेली आहे.''

भारताने कालच पाकिस्तानच्या उप उच्चायुक्तांना पाचारण केले होते व जाधव यांना वकिलांची मदत व भेट देण्याची मागणी केलेली होती.

Web Title: India's demand for the details of kulbhushan Jadhav's hearing