मोदींच्या राज्यात भारत हुकुमशाहीकडे

पीटीआय
Thursday, 4 March 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारताला हुकुमशाहीकडे नेल्याचा दावा मानवी हक्कांचा आढावा घेणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने केला आहे. फ्रिडम हाऊस असे नाव असलेल्या या संस्थेने वर्ल्ड २०२१ या आपल्या वार्षिक अहवालात भारताचा दर्जा एका पातळीने घटवित मुक्त पासून अंशतः मुक्त केला.

न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारताला हुकुमशाहीकडे नेल्याचा दावा मानवी हक्कांचा आढावा घेणाऱ्या अमेरिकेतील एका संस्थेने केला आहे. फ्रिडम हाऊस असे नाव असलेल्या या संस्थेने वर्ल्ड २०२१ या आपल्या वार्षिक अहवालात भारताचा दर्जा एका पातळीने घटवित मुक्त पासून अंशतः मुक्त केला. राजकीय हक्क आणि नागरी स्वातंत्र्य हे निकष असलेला स्वातंत्र्याचा गुणांक चारने घटून ६७ झाला आहे. त्यामुळे दर्जा खाली आला. या अहवालात म्हटले आहे की, मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक लोकशाहीचे नेतृत्व करण्याची क्षमता बाजूला टाकल्याचे दिसून येते. सर्वांना समान हक्क आणि सर्वसमावेशकतेच्या मूलभूत तत्त्वांना बगल देण्यात आली आणि संकुचित हिंदूत्ववातला खतपाणी घालण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रमुख आक्षेप

  • कोरोना काळात मोदी सरकार आणि राज्य पातळीवरील मित्र पक्षांकडून टीकाकारांची नाकेबंदी
  • बळजबरीने लादलेल्या लॉकडाउनमुळे लाखो स्थलांतरित कामगारांचे धोकादायक आणि नियोजनशून्य विस्थापन
  • कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल मुस्लिमांना अयोग्य पद्धतीने दोष, त्यामुळे मुस्लिमांवर हल्ले

म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळली; गोळीबारात आणखी 8 आंदोलकांचा मृत्यू

आठ दशकांचे कार्य
फ्रिडम हाऊसला बहुतांश निधी अमेरिकी सरकारच्या अनुदानातून मिळतो. 1941 पासून लोकशाहीच्या वाटचालीचा आढावा घेण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. गेल्या दीड दशकांत जागतिक पातळीवर लोकशाहीची घसरण झाल्याचे आणि गेल्या वर्षभरात जगातील 75 टक्के लोकसंख्येला खालावलेल्या स्थितीचा फटका बसल्याचेही सांगण्यात आले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias dictatorship in Modis state