भारताची अर्थव्यवस्था आता सहाव्या स्थानावर !

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जुलै 2018

सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन हे देश आहेत. या वर्षाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2018 मध्ये 7.4 टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर 2019 मध्ये ही वाढ 7.8 टक्के असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

नवी दिल्ली : मागील वर्षासाठी 2017 चे अद्ययावत आकडेवारी जागतिक बँकेने जाहीर केली असून, भारतीय अर्थव्यवस्थेने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेत फ्रान्सला मागे टाकले आहे. भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी रुपये तर फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असल्याचे जागतिक बँकने नमूद केले. 

सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन हे देश आहेत. या वर्षाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ 2018 मध्ये 7.4 टक्क्यांच्या गतीने वाढेल असा अंदाज वर्तवला होता. तर 2019 मध्ये ही वाढ 7.8 टक्के असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढेल आणि चीनच्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला होता. त्यानंतर आता 2017 मध्ये भारताचा जीडीपी 6.7 टक्क्यांनी वाढला. 

Web Title: Indias economy is now sixth