दुसऱ्या तिमाहीत भारताचा GDP वाढीचा दर ८.४ टक्क्यांवर

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जाहीर केली आकडेवारी
Construction
ConstructionSakal
Updated on

नवी दिल्ली : दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी सरकारनं जाहीर केली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताच्या विकासदरात वाढ पहायला मिळाली आहे. दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत ८.४ टक्क्यांनं वाढ झाली आहे. तसेच आठ कोअर सेक्टरच्या विकासदरातही वाढ नोंदवली गेली आहे.

Construction
लवकरच क्रिप्टो विधेयक आणणार; सीतारमण यांची राज्यसभेत माहिती

गेल्या आर्थिक वर्षात - ७.४ टक्के होता जीडीपीचा दर

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत जीडीपी वाढीत एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी उणे ७.४ टक्के होता. यापूर्वी जून तिमाहीत भारताच्या जीडीपीत सर्वाधिक वेगानं वाढ झाली होती. दरम्यान, जीडीपीमध्ये २०.१ टक्के दारानं वाढ झाली आहे.

आठ कोअर सेक्टर्समध्ये ७.५ टक्के वाढ

दरम्यान, आठ पायाभूत सुविधा क्षेत्रांचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये 7.5 टक्क्यांनी वाढलं आहे, जे मागील वर्षीच्या महिन्यात 0.5 टक्क्यांनी आकुंचन पावलं होतं. कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या आठ पायाभूत सुविधा क्षेत्रांचे उत्पादन ऑक्टोबर 2020 मध्ये 0.5 टक्क्यांनी घसरलं आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये समाविष्ट केलेल्या वस्तूंच्या वजनाच्या 40.27 टक्के आठ प्रमुख उद्योगांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com