पेट्रोल, डिझेल विक्रीचा मे महिन्यामध्ये उच्चांक 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलची विक्री मे महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचली आहे. यंदा मे महिन्यातील इंधन विक्रीने एप्रिल 1998 चा उच्चांक मोडला आहे.

नवी दिल्ली: देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलची विक्री मे महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचली आहे. यंदा मे महिन्यातील इंधन विक्रीने एप्रिल 1998 चा उच्चांक मोडला आहे. 

पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीतील पेट्रोलियम नियोजन आणि विश्‍लेषण विभागाने (पीपीएसी) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. मागील महिन्यात डिझेलची विक्री 7.55 दशलक्ष टनांपर्यंत गेली, तर पेट्रोलची विक्री 2.46 दशलक्ष टनांपर्यंत पोचली आहे. एप्रिल 1998 नंतरची ही पेट्रोल व डिझेलची ही उच्चांकी विक्री आहे.

जगात खनिज तेलाची सर्वाधिक मागणी असलेला भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जानेवारी ते मे या कालावधीत देशात ग्राहकांनी 35.2 दशलक्ष टन डिझेल खरेदी केले. मागील वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत यातील वाढ सहा टक्के आहे. 

दरमहा सरासरी विक्री 
पेट्रोल : 2.27 दशलक्ष टन 
डिझेल : 7.05 दशलक्ष टन 

Web Title: India's petrol, diesel demand rises to record highs in May