
नवी दिल्ली : भारताच्या आगामी अवकाश मोहिमांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या ‘अॅक्सिओम-४’ मोहिमेची मंगळवारी यशस्वी सांगता झाली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चारही अंतराळवीर भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी (ता. १५) दुपारी पृथ्वीवर सुखरूप परतले. ‘ग्रेस ड्रॅगन’ अंतराळयानाने दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो किनाऱ्याजवळ भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी समुद्रात यशस्वी ‘लँडिंग’ केले.