Shubhanshu Shukla
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे भारतीय हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी असून लवकरच ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणारे दुसरे भारतीय ठरणार आहेत. यापूर्वी सन 1984 मध्ये राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर म्हणून ‘सोयूझ टी-11’ यानातून अंतराळात गेले होते. त्यानंतर तब्बल चार दशकांनंतर शुभांशु शुक्ला यांच्यामुळे भारत पुन्हा एकदा अंतराळात पाऊल ठेवणार आहे.
शुभांशु शुक्ला यांनी रशियामधील अत्याधुनिक प्रशिक्षण पूर्ण केले असून, गगनयान मिशनसाठी त्यांची निवड झाली आहे. लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी भारतीय हवाई दलात उत्कृष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या शिस्तबद्धतेमुळे, वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे आणि धाडसी व्यक्तिमत्त्वामुळे ते भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी आदर्श ठरले आहेत