Afghanistan Girl Education : अफगाणिस्तानच्या मुलींना शिक्षणासाठी भारताचा आधार; दर महिन्याला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan girl education

Afghanistan Girl Education : अफगाणिस्तानच्या मुलींना शिक्षणासाठी भारताचा आधार; दर महिन्याला...

Afghanistan Girl Education : तालिबानने अफगाणिस्तानाचा ताबा घेतल्यानंतर दिल्लीत असलेली एकमेव अफगाण शाळाही अडचणीत आली होती. अफगाणिस्तानात तालिबानचे नियंत्रण आल्यानंतर शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर दिल्लीतील सय्यद जमालुद्दीन अफगाण शाळेला आर्थिक मदत मिळत नव्हती. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना पगाराची टंचाई जाणवत होती. सय्यद जमालुद्दीन अफगाण शाळा आत्तापर्यंत आर्थिक मदतीसाठी अफगाण सरकारवर अवलंबून होती.

1994 मध्ये वुमेन्स फेडरेशन ऑफ वर्ल्ड पीसने भारतातील अफगाण निर्वासितांच्या मुलांसाठी शैक्षणिक केंद्र म्हणून शाळेची स्थापना केली होती.

2008 पासून प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. 2017 मध्ये तिथे माध्यमिक शिक्षण सुरु झाले. राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या नेतृत्वाखालील अफगाण सरकारने भारतातील निर्वासितांच्या विनंतीनुसार, शाळेला निधी देण्यास सुरुवात केली होती.

तालिबानने घातलेल्या बंदीमुळे फक्त अफगाण मुलींना भारतात शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळाले आहे. दिल्लीतील शाळेत 278 विद्यार्थ्यांपैकी 135 मुलं आहेत आणि 143 मुली आहेत.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू...

मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. 2022 मध्ये पदवीधर झालेल्या 17 विद्यार्थ्यांनी विद्यापीठांमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये दिल्ली विद्यापीठातील 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

त्यापैकी सात मुली आहेत. 35 शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षिका स्त्रिया आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शाळेचे मासिक बजेट 5.5 लाख रुपये आहे.

हेही वाचा: Hassan Al Kontar : सात महिने त्याचं घर होतं एअरपोर्ट, अखेर त्याला कॅनडानं दिलं नागरिकत्व

अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझे म्हणाले, “तरुण अफगाण मुला-मुलींना शिक्षित करण्यासाठी भारताकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

भारताच्या पाठींब्याने शाळा अजूनही चालू आहे. यातून तालिबानला संदेश मिळाला असेल की, अफगाण मुलींचे शिक्षण कोणीही थांबवू शकत नाही.''

पुढे ते म्हणाले की, ''भारताने या कठीण काळात आम्हाला एकटे सोडले नाही आणि आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी आर्थिक मदत केली आहे.

भारत आमच्यासाठी खरा खरा मित्र बनला आहे. गेल्या पाच वर्षांत आम्हाला तीनदा शाळेचा परिसर बदलावा लागला पण सर्व आव्हाने असतानाही आम्ही हार मानली नाही.''