Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

Water Reservoirs: यापैकी 20 जलाशयांमध्ये जलविद्युत निर्मिती क्षमता आहे ज्यांना पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
Water Reservoirs In India
Water Reservoirs In IndiaEsakal

गेल्या मोसमात अपुरा पाऊस, हिवाळ्याच्या महिन्यांत अत्यल्प पाऊस आणि एप्रिलमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये दीर्घकाळापर्यंत उष्णतेच्या लाटा यामुळे देशातील 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी गुरुवारी मागील वर्षाच्या पातळीपेक्षा 19% खाली घसरली. हा सलग 30 वा आठवडा ज्यामध्ये पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. (India Facing Water Crisis)

केंद्रीय जल आयोगाच्या मते, पाण्याची पातळी गेल्या १० वर्षांच्या सरासरीपेक्षा ३०% कमी आहे. जलाशये क्षमतेच्या फक्त 28% पर्यंत भरली आहेत.

केंद्रीय जल आयोगानुसार, दक्षिणेकडील राज्यांमधील 42 जलाशयांमध्ये सध्या केवळ 16% पाणी साठा आहे. यापैकी ५ कोरडे पडले आहेत.

Water Reservoirs In India
Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

पूर्वेकडील राज्यांमधली 23 जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 3% जास्त पाणीसाठा आहे. मात्र, घसरलेल्या पाणी पातळीमुळे, विशेषत: दक्षिणेकडील राज्यांमध्ये उन्हाळ्याच्या महिन्यांत अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर धान आणि कडधान्ये यांसारख्या उन्हाळी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

यापैकी 20 जलाशयांमध्ये जलविद्युत निर्मिती क्षमता आहे ज्यांना पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.

Water Reservoirs In India
Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ईशान्य भारत, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताचा काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागांमध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला असल्याने धरणांमधील पाण्याची पातळी या महिन्यात आणखी घसरण्याची अपेक्षा आहे.

दक्षिण राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि गुजरात भागात ५ ते ८ दिवस उष्णतेच्या लाटा राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com