

Indigo Flight Update
esakal
Indian Aviation News Indigo : देशातील सर्वात मोठ्या विमानसेवा संस्थांपैकी एक असलेल्या एअर इंडिगो कंपनीची मागच्या काही दिवसांत विमान सेवा विस्कळीत झाली आहे. याबाबत इंडिगोने अधिकृत खुलासा केला आहे. नेटवर्क, सिस्टिम्स आणि क्रू रोस्टर व्यवस्थापनात अचानक आलेल्या अडचणींमुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करावी लागली होती. मात्र, परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न असून कंपनीने कालपासून केवळ ७००हून अधिक उड्डाणे सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे.