IndiGo Airline Update News : ‘इंडिगो’ विरोधात सरकार कडक कारवाईच्या तयारीत; ‘CEO’ बडतर्फ होणार?

IndiGo Airline Flight cancellations : एअरलाइनने मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केल्याने देशभर प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Government initiates strict action against IndiGo Airline and CEO Peter Elbers faces immediate removal amid escalating controversy.

Government initiates strict action against IndiGo Airline and CEO Peter Elbers faces immediate removal amid escalating controversy.

esakal

Updated on

Government will take Strict Action Against IndiGo Airline :  इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणे रद्द झालेली असल्याने देभरात प्रवाशांमधून प्रंचड संताप व्यक्त होत आहे. इंडिगो व्यवस्थापनावर आगपाखड सुरू आहे. दरम्यान आता प्राप्त माहितीनुसार सरकार देखील इंडिगोविरोधात कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

यानुसार आता इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना तत्काळ काढून टाकण्याची देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. शिवाय, एअरलाइनवर मोठा आर्थिक दंड देखील लावला जाऊ शकतो.

एअरलाइनने मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केल्याने देशभर प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकारी इंडिगोद्वारे चालवल्या जाणाऱ्या उड्डाणांची संख्या कमी करण्याचा विचार करत आहेत. जी भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइनविरुद्ध आतापर्यंतची सर्वात कठोर कारवाईचे संकेत आहेत.

Government initiates strict action against IndiGo Airline and CEO Peter Elbers faces immediate removal amid escalating controversy.
IndiGo owner Rahul Bhatia : 'इंडिगो' एअरलाइन कंपनीचे मालक राहुल भाटिया आहेत तरी कोण?

इंडिगोची उड्डाण रद्द झाल्यानंतर, इतर अनेक एअरलाइन्सनी भाडे वाढवले ​​आहेत, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. दरम्यान, विमान वाहतूक मंत्रालयाने विमान भाडे वाजवी राहावे यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी याची पुष्टी केली आहे.

Government initiates strict action against IndiGo Airline and CEO Peter Elbers faces immediate removal amid escalating controversy.
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, "कोणत्याही प्रकारच्या अन्याय्य किंमतींपासून प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी, मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com