

IndiGo Chairman Vikram Singh Mehta addressing the media with a formal apology issued over the recent airline controversy.
esakal
मागील काही दिवसांता इंडिगो एअरलान्सची शेकडो उड्डाणे रद्द झाल्याने देशभरातील हजारो प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. यानंतर सरकारनेही इंडिगो कंपनीला चांगलेच खडसावले. कंपनीनेही प्रवाशांची तिकीटाची रक्कम परत केली, शिवाय कंपनीच्या सीओंनी सरकारसमोर हात जोडले होते. यानंतर आता इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांचाही माफीनामा समोर आली आहे.
इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी बुधवारी एक्सवर व्हिडिओ पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थिताबाबत आणि प्रवाशांना झालेल्या त्रासाबाबत त्यांनी सर्वांची माफी मागितली आहे. याचवेळी त्यांनी नवीन नियमांना बगल देण्यासाठी एअरलाइनने जाणूनबुजून संकट निर्माण केल्याच्या आरोपांनाही स्पष्टपणे फेटाळले आहे.
एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओत इंडिगोचे अध्यक्ष विक्रम सिंग मेहता यांनी ३ डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द झाल्याची कबुली दिली आणि सांगितले की कंपनीने त्यांच्या ग्राहकांना निराश केले आहे. त्यांनी हेही सांगितले आहे की, एअरलाइनच्या सेवा अपेक्षेपेक्षा लवकर सामान्य झाल्या आहेत.
मेहता म्हणाले की नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) देशभरातील हजारो प्रवाशांना अडकवून टाकणाऱ्या घटनांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. तसेच त्यांनी पुष्टी केली की इंडिगो या सर्व संकटाची मूळ कारणे शोधण्यासाठी आणि अशी समस्या पुन्हा कधीही निर्माण होवू नये यासाठी व्यवस्थापनासोबत काम करण्यासाठी बाह्य तांत्रिक तज्ञांची नियुक्ती करेल.
याचबरोबर, झालेल्या गोंधळाची जबाबदारी स्वीकारताना, त्यांनी हा व्यत्यय जाणूनबुजून आणला गेला होता या दाव्याला नाकारले. त्यांनी सांगितले की काही आरोप पूर्णपणे खोटे आहेत, ज्यात इंडिगोने जाणूनबुजून हे संकट निर्माण केले आहे, आम्ही सरकारी नियमांना टाळण्याचा प्रयत्न केला आहे किंवा आम्ही सुरक्षिततेशी तडजोड केली आहे असे दावे समाविष्ट आहेत. हे सर्व दावे निराधार आहेत. आम्ही जुलै ते नोव्हेंबर या संपूर्ण कालावधीत सर्व अद्ययावत नियमांनुसार काम केले आणि त्यांना टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.