

A shocking plane crash scene where an aircraft unexpectedly landed on a moving car on a busy highway, causing chaos and emergency response action.
esakal
Florida plane crash आपण आतापर्यंत विविध विमान दुर्घटना पाहिल्या असतील किंवा त्याबाबत ऐकल्या असतील. पण अमेरिकेत एक अशी विमान दुर्घटना घडली आहे, ज्याचा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. फ्लोरिडामध्ये एक विमान चक्क रस्त्यावर धावत्या कारवर लँड झालं.
विमान कारवर आदळतानाचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे ही कार एका वृद्ध महिला चालवत होती, जी या दुर्घटनेत जखमी झाली आहे. न्यू यॉर्क पोस्टने याबाबतवृत्त दिले आहे की, "फिक्स्ड-विंग मल्टी-इंजिन" असलेले हे विमान फ्लोरिडाच्या रस्त्यावर टोयोटा कॅमरी मॉडेलच्या कारला धडकले. सोमवारी सांयकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
यावेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या कारच्या डॅशकॅमवर हा धक्कादायक व्हिडिओ कैद झाला आहे. त्यात विमान एका वर्दळीच्या रस्त्यावर आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करताना थेट कारला धडकताना दिसत आहे. सुदैवाने विमान धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला नाही, अन्यथा जीवितहानी होण्याचीही शक्यता होती.
दरम्यान, या अपघातानंतर वयस्कर महिला चालकास स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. नशीब बलवत्त म्हणून या महिलेस फार गंभीर इजा झाली नाही. मात्र विमानाचा पायलट यामध्ये जखमी झालेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.