

इंडिगो एअरलाइन्समध्ये तांत्रिक अडचण आणि स्टाफच्या कमतरतेमुळं गेल्या आठवड्याभरापासून विमान उड्डाणं रद्द केली जात आहेत. विमानांना उशीर होत असल्यानं आणि अचानक उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, आता नागरी उड्डयन मंत्रालयानं मोठे अपडेट दिले आहेत. आतापर्यंत विमान उड्डाणं रद्द झाल्यानं फटका बसलेल्या प्रवाशांना भरपाई पोटी जवळपास ६१० कोटी रुपये रिफंड देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी शेअरधारकांसोबत बैठक घेतल्यानंतर रिफंडबाबत आदेश देण्यात आले.