

CJI Suryakant
esakal
इंडिगो विमान कंपनीचे सतत उड्डाण रद्द होत असल्यामुळे निर्माण झालेलं प्रवासी संकट आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. प्रवाशांच्या प्रचंड गैरसोयीबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली असून मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलांना आपल्या निवासस्थानी बोलावले आहे. याचिकाकर्ते आजच सरन्यायाधीशांकडे विशेष खंडपीठ स्थापन करण्याची विनंती करणार आहेत.