Passengers stranded at major Indian airports as IndiGo continues mass flight cancellations due to crew shortages and FDTL rule implementation.
esakal
देश
IndiGo Flight Crisis : इंडिगोची आजही ४५० उड्डाणे रद्द, भारताच्या हवाई इतिहासातील सर्वात मोठे संकट कधी संपणार ?
IndiGo Flight Cancellations : सोमवारी एकूण ४,३५० उड्डाणांवर परिणाम झाला असून अनेक प्रमुख विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला. दिल्ली आणि बेंगळुरू विमानतळांवर सर्वाधिक उड्डाणे रद्द झाली, अन्य विमानतळांवरही मोठे व्यत्यय आले.
इंडिगोची विस्कळीत झालेली विमानसेवा आणखी सुधारलेली नाही. आज सातव्या दिवशी शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ज्यामुळे प्रमुख विमानतळांवर इंडिगो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. भारतातील हवाई प्रवासाच्या इतिहासात असे संकट यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते.

