

IndiGo Flight
sakal
वाराणसीतील लाल बहाद्दुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दाट धुक्यामुळं विमान रद्द झाल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तर कोलकात्याहून वाराणसीला जाणारं विमान दुपारी एक ऐवजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचलं. विमानाला उशीर झाल्यानं आणि क्रू मेंबर्सनी शिफ्ट संपल्यानं विमान उड्डाणाला नकार दिला. यामुळे १७९ प्रवाशांना बोर्डिंग पास मिळाल्यानंतरही रात्रभर हॉटेलमध्ये थांबण्याची वेळ आली. इंडिगो एअरलाइन्सकडून शेवटी दुसऱ्या दिवशी प्रवाशांना कोलकात्याला जाण्याची व्यवस्था केली.