

Indigo Flight Engine Failure Before Landing, 224 Passengers Safe at Chennai Airpor
esakal
हवेत असताना इंडिगो विमानाचे डावे इंजिन अचानक बंद पडल्याने चेन्नई विमानतळावर मंगळवारी रात्री पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. कोलकाताहून चेन्नईकडे येणाऱ्या या विमानात २२४ जण होते. लँडिंगच्या काही मिनिटे आधी ही तांत्रिक अडचण निर्माण झाली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमान सुरक्षितपणे उतरवले. त्यामुळे विमानातील सर्व २२४ प्रवासी सुरक्षित राहिले.