IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

Emergency Landing Back at Kochi Airport :जाणून घ्या, पुढे नेमकं काय घडलं? याबाबत इंडिगो एअरलाइन्सनेही निवेदनाद्वारे माहिती दिली
IndiGo flight from Kochi to Abu Dhabi made an emergency return due to a technical glitch, ensuring passenger safety.

IndiGo flight from Kochi to Abu Dhabi made an emergency return due to a technical glitch, ensuring passenger safety.

esakal

Updated on

IndiGo Flight Kochi to Abu Dhabi Faces Technical Glitch: कोचीहून अबुधाबीला निघालेल्या इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने, जवळपास १८० पेक्षाही अधिक प्रवाशांसह विमानातील क्रू मेंबर्सचा जीव हवेतच टांगणीला लागला होता. साधारण दोन तास विमान हवेतच घिरट्या घालत होते. अखेर हे विमान पुन्हा कोची विमानतळावर कसेबसे उतरवण्यात आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. तर विमानाधील सर्व प्रवाशांना नंतर दुसऱ्या विमानाने अबुधाबीला पाठवले गेले.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.१० वाजता फ्लाइट क्रमांक ६E-१४०३ कोचीहून अबुधाबीसाठी निघाले होते. मात्र विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड उद्भवला. ही बाब पायलटसह क्रू मेंबर्सच्या लक्षात आली.

यानंतर विमान बराच वेळ हवेतच घिरट्या मारत राहिले आणि अखेर हे विमान पुन्हा कोचीला वळवण्यात आले. या दरम्यान विमानामधील जवळपास १८० प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. प्रवाशांमध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.

IndiGo flight from Kochi to Abu Dhabi made an emergency return due to a technical glitch, ensuring passenger safety.
PM Modi and Emmanuel Macron: भारताचा दबदबा जागतिक पातळीवर कायम! आता मोदींची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांशीही चर्चा

परंतु सुदैवाने यामध्ये काहीह अघटीत घडले नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप विमानतळावर उतरले. यानंतर विमानातील क्रू मेंबर्सच्या ड्युटीचे तास पूर्ण झाल्यामुळे विमानातील क्रू मेंबर्समध्येही बदल करण्यात आला आणि नवीन क्रूसह दुसऱ्या विमानाने प्रवाशांना अबुधाबीला पाठवण्यात आले.

इंडिगोने याबाबत काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की, '६ सप्टेंबर २०२५ रोजी कोचीहून अबू धाबीला जाणारी इंडिगो फ्लाइट क्रमांक ६ई १४०३ मध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून वैमानिकांनी विमान मागे वळवण्याचा निर्णय घेतला आणि विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.'

IndiGo flight from Kochi to Abu Dhabi made an emergency return due to a technical glitch, ensuring passenger safety.
Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

एअरलाइनने सांगितले की प्रवाशांना जेवण पुरवण्यात आले आणि त्यांना दुपारी ३.३० वाजता दुसऱ्या विमानाने अबू धाबीला पाठवण्यात आले. तर तांत्रिक बिघाड झालेले विमान दुरूस्ती आणि देखभालीसाठी पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com