Plane Viral Video: ...अन् त्याने पळत जाऊन पायलटला केली धक्काबुक्की...इंडिगो फ्लाइटमध्ये मोठा गोंधळ; Video Viral

Plane Viral Video: विमानात एका व्यक्तीने अचानक पळत जावून पायलटवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
Plane Viral Video
Plane Viral VideoEsakal

गेल्या काही दिवसांमध्ये विमान प्रवासादरम्यान गोंधळ घातल्याच्या आणि क्रूवर चिडल्याच्या, त्याच्यांशी वाद घातल्याच्या घटना वारंवार समोर येतात. अशातच, एका विमान प्रवासादरम्यान एका व्यक्तीने क्रूवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात प्रवाशांनी गोंधळ घातला आणि क्रूच्या अंगावर अचानक धावून जात हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विमान उड्डाणाला उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या एका व्यक्तीने वैमानिकावर हल्ला केला आहे. आता या घटनेचा आरोप असलेल्या प्रवाशाला अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Plane Viral Video
Ram Mandir : २२ जानेवारीला राम येणार नाहीत, स्वतः माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं; बिहारच्या मंत्र्याचं विधान

व्हिडिओमध्ये काय आहे?

व्हायरल व्हिडिओ पॅसेंजर सीटवरून शूट करण्यात आला आहे. पायलट आणि इतर क्रू मेंबर्स उभे राहून काही घोषणा करत असल्याचे दिसत आहे. अचानक एक व्यक्ती वेगाने धावत येतो आणि पायलटवर हल्ला करतो. या घटनेनंतर फ्लाइटमध्ये उपस्थित प्रवासी आणि एअर होस्टेस आवाज करू लागले. तेव्हा ज्या पायलटवर हल्ला झाला तो आत जातो.

Plane Viral Video
Weather Update: धुक्यांचा परिणाम विमान, रेल्वे प्रवासावर; तीव्र धुक्यामुळे पुण्याहून १० विमाने रद्द

काय आहे प्रकरण ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना इंडिगो विमानात घडली. मात्र ते कोणत्या विमानाचे होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे म्हटले जात आहे की, विमानाच्या सुरुवातीच्या क्रूने FDTL म्हणजेच फ्लाइट ड्युटी वेळेच्या मर्यादांचे उल्लंघन केले, ज्यामुळे नवीन पायलट विमानात आले आणि घोषणा करत होते. विशेष म्हणजे विमानाला खूप उशीर झाला होता.

यावेळी संतापलेला एका प्रवासी ज्याने पिवळ्या रंगाची हुडी घातलेला तो तरुण आला आणि त्याने घोषणा करत असलेल्या पायलटवर हल्ला केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे की, त्याला मारहाण करणाऱ्या व्यक्ती आणि एअर होस्टेसमध्ये वाद झाला होता. एकीकडे ती व्यक्ती म्हणत आहे, 'विमान चालवायचं असेल तर चालवा, नसेल तर चालवू नका, गेट उघडा...किती वेळ आम्ही इथे बसलो आहोत?'.

Plane Viral Video
Weather Update: गारठा आणखी वाढणार; पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान विभागाने वर्तवला अंदाज

दरम्यान, धुक्यामुळं विमान प्रवासाला उशीर होत असल्यामुळं अनाउसमेंट करणाऱ्या पायलटला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात एव्हिएशन सिक्युरिटी एजन्सीने तपास सुरू केला आहे. इंडिगोने मारहाण करणाऱ्या प्रवासी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटला (6E-2175) धुक्यामुळे उशीर होत होता त्यावेळी पायलट विमान उशीर होत असल्याची माहिती देत होता. त्यावेळी त्याला मारहाम करण्यात आली होती. साहिल कटारिया असं या प्रवाशाचं नाव असल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com