Indigo Airlines
sakal
Government Action Against IndiGo Airlines : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने देशांतर्गत विमानतळांवर ७०० हून अधिक स्लॉट सोडले आहेत. डीजीसीएने कठोर कारवाई केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे, एअरलाइनला त्यांची हिवाळ्यातील उड्डाणे कमी करण्याचे आदेश दिले गेले होते.
मागील वर्षी डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या गोंधळामुळे इंडिगोवर ही कारवाई केली गेली आहे. त्या वेळी इंडिगोच्या प्रवाशांना विमानतळांवर तासंतास वाट पाहावी लागली आणि हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर ३ ते ५ डिसेंबर दरम्यान, अंदाजे अडीच हजारांहून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली होती तर जवळपास दोन हजार उड्डाणांना विलंब झाला होता. ज्यामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता.
या व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर, डीजीसीएने कडक भूमिका घेतली आणि इंडिगोचे हिवाळी वेळापत्रक १० टक्क्यांनी कमी केले. याचा अर्थ एअरलाइनला त्यांच्या काही सेवा रद्द कराव्या लागणार आहेत. या आदेशानंतर, इंडिगोने आता मंत्रालयाला ७१७ रिकाम्या स्लॉटची यादी सादर केली आहे. स्लॉट म्हणजे विमानाला विमानतळावर उतरण्यासाठी आणि निघण्यासाठी दिलेला निश्चित वेळ असते.
इंडिगोच्या रिकाम्या झालेल्या स्लॉटपैकी सर्वात मोठा भाग देशातील प्रमुख महानगरांमध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७१७ स्लॉटपैकी ३६४ स्लॉट दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख मेट्रो विमानतळांवर आहेत. यापैकी हैदराबाद आणि बेंगळुरूमध्ये सर्वाधिक स्लॉट असल्याचे म्हटले जाते. हे स्लॉट जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी रिकाम्या करण्यात आले आहेत.
यावर नागरी उड्डाण मंत्रालयाने तात्काळ प्रतिसाद दिला आहे आणि इतर विमान कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इतर विमान कंपन्यांनी या रिकाम्या स्लॉटचा वापर करावा अशी सरकारची इच्छा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.