Mizoram Air Strike : एअरफोर्सने चक्क मिझोरमवर केला होता बॉम्ब हल्ला, त्यातील एक फायटर पायलट होते सुरेश कलमाडी..

लालदुहोमा हे देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर होते.
Mizoram Air Strike
Mizoram Air StrikeeSakal

मिझोरम विधानसभेचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये लालदुहोमा यांच्या एमएनएफ पक्षाने बहुमत मिळवून इतिहास रचला आहे. लालदुहोमा हे देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर होते. आजच्या विजयामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

यामुळे इंदिरा गांधी यांचा मिझोरम संबंधित एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 28 फेब्रुवारी 1966 रोजी मिझो नॅशनल आर्मीने भारताविरुद्ध बंड पुकारलं होतं. यामुळे आजूबाजूच्या क्षेत्रात मोठं युद्ध सुरू झालं होतं. 2 मार्चपर्यंत एमएनएने ऐजवालमधील शस्रघर आणि खजिनाघराचा ताबा घेतला. ऐजवाल दक्षिणही हळू हळू त्यांच्या ताब्यात जात होतं. त्यांनी भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टर्सना देखील लक्ष्य केलं होतं.

5 मार्च 1966 रोजी भारताने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. वायुसेनेच्या विमानांनी ऐजवालला घेरलं आणि मशीन गन्सचा मारा सुरू केला. यामध्ये कित्येक निष्पाप नागरिकांचा जीवही गेला होता. या हल्ल्यांमध्ये कित्येक ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या. स्थानिक नागरिकांनी आपली घरं सोडून पलायन केलं होतं.

Mizoram Air Strike
Mizoram Result : अवघ्या पाच वर्षांपूर्वी तयार झालेल्या पक्षाने रचला इतिहास; मिझोरममध्ये ZPMने कशी मिळवली सत्ता?

कोणी चालवली विमानं?

या हल्ल्यामध्ये फ्रान्स-मेड डसॉल्ट ऑरागन आणि ब्रिटिश हंटर्स या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी यांनी ही विमानं उडवली होती. यावेळी त्यांनी ऐजवाल शहरावर बॉम्ब हल्लेही केले होते. पायलट आणि कलमाडी हे पुढे काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले, आणि पुढे जाऊन मंत्रीही झाले होते.

भारताने आपल्याच नागरिकांवर हल्ला केल्याची ही पहिली आणि एकमेव वेळ ठरली. या हल्ल्यामध्ये एमएनएफचा पराभव झाला. मात्र, पुढील 20 वर्षांपर्यंत त्यांचा विद्रोह सुरू होता. त्यानंतर पुढे 1986 साली जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हा मिझोरम शांती करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

Mizoram Air Strike
Lalduhoma : IPS अधिकारी, इंदिरा गांधींचे सिक्युरिटी चीफ.. अन् आता मिझोरमचे मुख्यमंत्री! कसा आहे लालदुहोमा यांचा प्रवास?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com