Indira Gandhi Birth Anniversary: खरंच इंदिरा गांधी दोषी होत्या का? वाचा काय होतं गूढ नगरवाला प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indira Gandhi Birth Anniversary

Indira Gandhi Birth Anniversary: खरंच इंदिरा गांधी दोषी होत्या का? वाचा काय होतं गूढ नगरवाला प्रकरण

Indira Gandhi: भारतीय महिला पंतप्रधानाचं पद भूषवणाऱ्या इंदिरा गांधीची जेवढी जगभऱ्यात ख्याती आहे तेवढीच त्यांच्या वादग्रस्त विधानांची आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपांची जगभऱ्यात चर्चा चालते. आज इंदिरा गांधी यांची जयंती. त्यांना एका घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. मात्र हे प्रकरण उलगडून दोषीला अटक झाल्यानंतर सत्याचा उलगडा होईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

२४ मे १९७१ ची ही गोष्ट. दिल्लीच्या संसद भवनात इंदिरा गांधीच्या नावानं फोन गेला. या फोनकॉलद्वारे इंदिरा गांधींना ६० लाखाची भरभक्कम रक्कम मागवली होती. पंतप्रधान मॅडमने इमरजंसीमध्ये ही रक्कम मागवली म्हटल्या बँकेत असणाऱ्या हक्सर यांनी एवढी मोठी रक्कम रवाना करण्यासाठी सगळी व्यवस्था केली. आणि मल्होत्रा यांना पैसे दिल्याचा रिप्लाय एका कोडद्वारे केला गेला.

बँकेत केल्या गेलेल्या कॉलद्वारे इंदिरा गांधींच्या आवाजात जी स्किम बँकेतल्या अधिकाऱ्यांना समजवण्यात आली होती त्याप्रमाणेच त्यांना पैशांची बॅग मल्होत्रांच्या कारमध्ये ठेवत काही अंतरावर उभ्या असलेल्या उंच गोऱ्या व्यक्तीच्या हातात दिली. या व्यक्तीने जाताना अधिकाऱ्यांना तुम्हाला इंदिराजींचे आता कौतुक ऐकायला मिळेल असा असे त्यांना सांगितले.

हे सगळे अधिकारी जेव्हा इंदिरा गांधींना भेटायला गेले तेव्हा त्यांना सत्य ऐकून घामच फुटला. इंदिरा गांधींना पैसे मागवलेच नसल्याची बाब त्यांच्या पुढे आली. हे प्रकरण नंतर पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिसांनी ज्या व्यक्तीच्या हाती पैसे दिले गेल्या होते त्याच्या टॅक्सीचा शोध लावला. नंतर हळूहळू धागेदोरे सापडत गेले. आणि पैशांसह अखेर तो व्यक्ती सापडला. त्या व्यक्तीचं नाव होतं रुस्तम नगरवाला.

हा व्यक्ती स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश आर्मीत होता. तिथे त्याने बराच काळ इंटेलिजंसचं काम केलेलं. बांग्लादेश निर्मितीच्या मोहिमेवर त्याची नियुक्ती झाली असल्याचा दावा त्याने केला. या मोहिमेसाठी पैसे लागणार होते म्हणून बनावटी टेलिफोनचा बनाव रचल्याचा त्याने सांगितले.

या सगळ्या प्रकरणाची शहानिशा सुरू असतानाच केसची चौकशी करत असलेल्या एसीपी कश्यप यांचा अपघाती मृत्यू झाला. जेलमध्ये असणाऱ्या नगवालाने एका सुप्रसिद्ध संपादकाला महत्वाची माहिती सांगण्यासाठी भेटण्याची इच्छा व्यक्त केली.मात्र संपादकाने त्याच्या वार्ताहाराला पाठवले म्हणून नगरवालाने काहीही सांगितले नाही.

हे सगळं प्रकरण एवढ्या टोकाला गेलं की अख्ख्या दिल्लीत या प्रकरणाची चर्चा सुरू होती. बांग्लादेशच्या नावाखाली इंदिरा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशाचा पैसा लुटला असे आरोप विरोधी पक्षाकडून झालेत. जेव्हा नगरवालाला या प्रकरणात खरे सांगण्यास धमकवण्यात आले तेव्हा मात्र त्याचा खून झाला.

आरोपीचा खून झाला म्हणून हे प्रकरण काही थांबले नाही. न्या. पी. जगमोहन यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. एकून साडे आठशे पानांचा रिपोर्ट सादर झाला मात्र इंदिरा गांधींवर झालेले आरोप सिद्ध झाले नाहीत. मात्र आजही या प्रकरणाबाबत अनेत संभ्रम अनेक लोकांच्या मनात कायम आहे.