

A devastating fire engulfs a residential building in Indore, reportedly triggered by a short circuit during electric vehicle charging, resulting in multiple casualties.
esakal
Summary
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीषण आगीची दुर्घटना घडून ७ जणांचा मृत्यू झाला.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगदरम्यान शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
काही क्षणातच तीन मजली इमारत पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात लागलेल्या एका भीषण आगीच्या घटनेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात 'शॉर्ट सर्किट'मुळे घडला. मिळालेल्या माहितीनुसार घराबाहेर एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी लावले होते. यामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि अवघ्या काही क्षणातच संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.