उद्योगपती शेखर रेड्डी यांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

चेन्नई : पैशाच्या गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती आणि कंत्राटदार शेखर रेड्डी यांना आज सीबीआयने अटक केली. कालच्या छापेसत्रात त्यांच्याकडून 127 किलो सोने आणि 106 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली होती. रेड्डी यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तीन जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

प्राप्तिकर खात्याने चेन्नईत रेड्डी यांच्या निवासस्थानी छापे घातले होते. तेथून मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने जप्त केले होते. या प्रकरणी प्राप्तिकर खात्याने शेखर रेड्डी, श्रीनिवास रेड्डी आणि प्रेम यांची चौकशी केली होती. शेखर रेड्डी हे बडे कंत्राटार असून, ते सार्वजनिक विभागाचे अनेक कंत्राटी कामे हाती घेत. प्रसारमाध्यमाच्या वृत्तानुसार त्यांचे हस्तक रोकडच्या बदल्यात सोने घेत असत.

प्राप्तिकर खात्याच्या छाप्यादरम्यान त्यांच्या कागदपत्रांचीदेखील तपासणी करण्यात आली होती. शेखर रेड्डी यांचे हस्तक नोटाबंदीनंतरही जुन्या नोटा बदलत असत. ईडीने मंगळवारी पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शेखर रेड्डी यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये रांगा लागलेल्या असताना दोन हजारांच्या नोटा कोठून आणल्या याची चौकशी ईडी करणार आहे.

Web Title: industrialist reddy arrested