उद्योगांनी जोखीम पत्करावी, क्षमता वाढीसाठी गुंतवणूक करावी: सीतारामन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगांनी जोखीम पत्करावी, क्षमता वाढीसाठी गुंतवणूक करावी: सीतारामन

उद्योगांनी जोखीम पत्करावी, क्षमता वाढीसाठी गुंतवणूक करावी: सीतारामन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सांगितले की, अर्थव्यवस्था सुधारण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत आणि आता उद्योगांनीही जोखीम पत्करण्यास आणि क्षमता वाढीसाठी गुंतवणूक करण्यास तयार असले पाहिजे. CII ग्लोबल इकॉनॉमिक पॉलिसी कॉन्फरन्स 2021 ला संबोधित करताना, सीतारामन म्हणाल्या की, "देशाचे आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उद्योगांनी पुढे आले पाहिजे."

"माझे उद्योगांना आवाहन आहे की, क्षमता वाढवण्यात आणखी विलंब करू नका. उदयोन्मुख नवीन क्षेत्रे पाहता तुम्ही भागीदार शोधण्यात उशीर करू नये," असे सांगत आयात अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवर भर देताना त्या म्हणाल्या. "जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्यात कोणतीही अडचण नाही. परंतु तयार उत्पादनांची आयात कमी केली पाहिजे."

सीतारामन म्हणाल्या, "जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्याची इच्छा असूनही, आपल्याला त्याच्याशी निगडित धोके लक्षात ठेवावे लागतील." मात्र, आयातीसाठी दरवाजे बंद करण्याबाबत आपण बोलत नसल्याचे त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी उद्योगांना आयात केलेल्या तयार उत्पादनांची संख्या कमी करण्यास आणि उत्पादनात गुंतवणूक वाढविण्यास सांगितले.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

उत्पन्नातील असमानता कमी करण्यासाठी उद्योगांना अधिक रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी केली. सीतारामन म्हणाल्या, "जेव्हा भारताची नजर वेगवान वाढीवर असते, त्या वेळी भारतीय उद्योगांनी अधिक जोखीम पत्करावी आणि भारताची इच्छा समजून घ्यावी असे मला वाटते.". सुमारे 1,500 कायदे रद्द करण्याबरोबरच, प्रत्येक मंत्रालयाला उद्योगांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.

loading image
go to top