काळ्या पैशाची माहिती थेट सरकारला कळवा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : काळा पैसाधारकांची माहिती नागरिक थेट आता सरकारला कळवू शकणार आहेत. नागरिकांनी काळा पैसाधारकांची माहिती ई-मेल आयडी : blackmoneyinfo@incometax.gov.in येथे पाठवावी, असे आवाहन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी शुकवारी केले.

केंद्र सरकारच्या या पावलामुळे काळा पैसाधारकांची माहिती नागरिकांकडून थेट सरकारला मिळून कारवाई करणे सोपे जाणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात रोकड देशभरात जप्त करण्यात येत आहे. प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभाग स्थानिक पोलिसांना हाती घेत देशभरात कारवाई करीत आहेत. या कारवाईत नागरिकांना सामावून घेण्यासाठी आणि जास्तीत जास्त काळा पैसाधारकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने जनतेलाच माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: inform govt about black money