दहा कोटी भारतीयांची माहिती चोरीला?

Cyber Crime
Cyber Crime

क्रेडिट-डेबिट कार्ड डेटा इंटरनेटवर विक्रीला
नवी दिल्ली - जवळपास १० कोटी भारतीयांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती चोरीला गेली असून, या माहितीची विक्री केली जात असल्याचा दावा सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी केला आहे. त्यांच्या मते, डार्क वेबवरील बहुतेक डेटा बंगळुरू येथे मुख्य कार्यालय असलेल्या डिजिटल पेमेंट्स गेटवे ‘जस-पे’च्या सर्व्हरवरून लीक झाला आहे. 

दरम्यान, सायबर हल्ल्याच्या वेळी कोणताही कार्ड नंबर किंवा आर्थिक माहिती लीक झालेली नसल्याचे ‘जस-पे’चे म्हणणे आहे. तसेच चोरीला गेलेल्या माहितीची संख्या ही १० कोटींपेक्षा खूप कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हॅकिंगचा प्रयत्न झालेल्या वृत्ताला दुजोरा
‘जस-पे’ने म्हटले आहे, की १८ ऑगस्ट २०२० रोजी आमच्या सर्व्हरवर ‘हॅकिंग’चा प्रयत्न झाला होता. परंतु, काहीही प्रक्रिया करण्यापूर्वीच त्यावर आम्ही ताबा मिळविला. कोणताही कार्ड नंबर, आर्थिक माहिती किंवा डेटा त्यावेळी लीक झाला नाही. कंपनीने कबूल केले आहे, की अज्ञात ई-मेल, फोन नंबर आणि मास्क्ड कार्ड नंबर (पहिले आणि शेवटचे चार अंक) सायबर हल्ल्यांमध्ये लीक झाले होते, परंतु त्याला संवेदनशील डेटा म्हणता येणार नाही.

टेलिग्रामच्या माध्यमातून माहिती विक्रीचा प्रयत्न
राजशेखर यांनी असा दावा केला आहे, की हॅकर्स डार्क वेबवर माहिती विकत आहेत आणि ते टेलीग्राम अ‍ॅपद्वारे डेटा खरेदीदारांशी बोलत होते. त्याऐवजी ते बिटकॉइन स्वरुपातील पैशांची मागणी करीत होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com