येत्या अर्थिक वर्षात Infosys मध्ये 55 हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी!

Infosys may hire over 55000 freshers in fy23 says ceo salil parekh
Infosys may hire over 55000 freshers in fy23 says ceo salil parekh

देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी Infosys, आर्थिक वर्ष 2023 मध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तब्बल 55 हजारांहून अधिक नवीन पदवीधरांना भरती करू शकते. अशी माहिती इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांनी दिली आहे. ते म्हणाले की, तंत्रज्ञान क्षेत्रात अभियांत्रिकी आणि विज्ञान पदवीधरांना खूप मागणी आहे, परंतु यासाठी त्यांना कमी कालावधीत नवीन कौशल्ये आत्मसात करावी लागतील.

55 हजार फ्रेशर्सना नोकऱ्या

पारेख यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, आम्ही 22 या आर्थिक वर्षात 55 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भरती करणार आहोत. आम्हाला वाटते की आम्ही पुढील वर्षी (FY23) इतकेच किंवा यापेक्षा अधिक पदवीधरांना भरती करुन घेऊ. ते म्हणाले की, इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2022 मध्ये वार्षिक महसुलात 20 टक्के वाढ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामुळे फ्रेशर्सना कंपनीत सामील होण्यासाठी आणि वाढण्यासाठी मोठ्या संधी निर्माण होतील.

Infosys may hire over 55000 freshers in fy23 says ceo salil parekh
Paytm देतंय कुठल्याही गॅरंटीशिवाय 5 लाखांचं कर्ज; वाचा प्रोसेस

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळते

पारेख म्हणाले की, कंपनी स्किलिंगवर खूप लक्ष देते. यासाठी, इन्फोसिस फ्रेशरला फ्लोअरवर पाठवण्यापूर्वी 6 ते 12 आठवड्यांचे प्रशिक्षण देते. याशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना लेटेस्ट स्किल अपडेट करण्यासाठी अनेक रीस्किलिंग प्रोग्राम देखील चालवते. पारेख यांनी महाविद्यालयातील तरुण विद्यार्थ्यांना अनेक संधी त्यांची वाट पाहत असल्याचे सांगितले, परंतु कमी कालावधीत नवीन कौशल्ये आत्मसात करण्यास तयार राहण्यास देखील ते म्हाणाले.

त्यांनी सांगितले की, सध्याच्या कर्मचार्‍यांना दर दशकात स्वतःला पुन्हा तयार करावे लागते. परंतु पुढे जाणारे टेक्नोलॉजी सायकल फारच लहान असेल आणि तरुण पदवीधरांना दर तीन ते पाच वर्षांनी स्वतःला स्किल्ड करावे लागेल.

Infosys may hire over 55000 freshers in fy23 says ceo salil parekh
नव्या अवतारात येतेय WagonR 2022, काय असेल किंमत फीचर्स? वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com