नौदलाने दाखवली स्वदेशी बनावटीच्या INS विशाखापट्टणमची खास झलक; पाहा व्हीडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

INS Visakhapatnam
नौदलाने दाखवली शक्तिशाली INS विशाखापट्टणमची खास झलक; पाहा व्हीडिओ

Video: नौदलाने दाखवली शक्तिशाली INS विशाखापट्टणमची खास झलक

पाकिस्तान आणि चीन सारख्या शत्रुराष्ट्रांचं आव्हान ओळखून भारत सध्या संरक्षणाच्या मुद्यावर सर्व पातळ्यांवर काम करताना दिसत आहे. त्यामुळे देशाच्या भूसीमांबरोबरच सागरी सीमा देखील संरक्षित करणे गरजेचे आहे. याच दृष्टीकोणातून आयएनएस विशाखापट्टणमचा (INS Visakhapatnam) भारतीय नौदलात समावेश करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमिवर भारतीय नौदलाने या लढाऊ युद्धनौकेची झलक दाखवणारा खास व्हीडिओ प्रदर्शित केला आहे.

भारतीय लष्कराच्या सेवेत समाविष्ट होणारी स्वदेशी बनावटीची INS विशाखापट्टणम ही स्टेल्थ गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. आजपासून ही युद्धनौका देशाच्या सेवेत रुजू होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह INS विशाखापट्टणमच्या जलावतारणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.

हेही वाचा: सिद्धूंनी आपल्या मुलांना भारत-पाक सीमेवर पाठवावं: गौतम गंभीर

दरम्यान, INSविशाखापट्टणमचे कमांडिंग अधिकारी कॅप्टन बिरेंद्र सिंह यांनी आयएनएस विशाखापट्टनमच्या जलावतारणासाठी आम्ही सज्ज असल्याचं सांगितलं आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, या युद्धनौकेच्या बांधणीत स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. जलावतारणानंतर आणखी काही चाचण्या होतील असेही यांनी सांगितले.

loading image
go to top