Insat-3ds Satellite : ‘इन्सॅट- ३ डीएस’चे यशस्वी प्रक्षेपण

वातावरणाचा अभ्यास होणार अधिक सखोल
Insat-3ds Satellite
Insat-3ds Satellitesakal

श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) - पृथ्वी आणि सागरी पृष्ठभागाच्या अभ्यासाच्या आपल्या मोहिमेत पुढचा टप्पा गाठत आज भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या साह्याने ‘इन्सॅट- ३ डीएस’ या अत्याधुनिक उपकरणे असलेल्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

या उपग्रहाच्या मदतीने वातावरणाचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. या प्रक्षेपणाद्वारे ‘जीएसएलव्ही’ तंत्रज्ञानाचीही चाचणी झाली असून ‘खोडकर मुलगा (नॉटी बॉय) आता समजदार (मॅच्युअर्ड) झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे.

श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून शनिवारी संध्याकाळी ५.३५ वाजता ‘जीएसएलव्ही एफ-१४’ने प्रक्षेपण केले. वीस मिनिटांनंतर प्रक्षेपकाचा सर्वांत वरील टप्पा विलग झाला आणि त्याद्वारे उपग्रहाला त्याच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले. या उपग्रहाला नंतर भूस्थिर कक्षेत आणले जाणार आहे. हे उड्डाण म्हणजे ‘जीएसएलव्ही’ तंत्रज्ञानावर उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्‍नचिन्हावरही उत्तर होते.

‘जीएसएलव्ही’चे याआधीचे उड्डाण अयशस्वी ठरले होते. त्यामुळेच आजच्या यशानंतर एस. सोमनाथ यांनी ‘जीएसएलव्ही’ तंत्रज्ञानाचे कौतुक केले. या यशामुळे या तंत्रज्ञानाबाबतचा आत्मविश्‍वास दुणावला असल्याचे ते म्हणाले. ‘इस्रो’च्या आगामी ‘निसार’ मोहिमेसाठी याच प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे.

असे आहे ‘जीएसएलव्ही एफ १४’

  • उंची : ५२ फूट

  • एकूण टप्पे : ३

  • सर्वांत वरील टप्प्यात क्रायोजेनिक इंधन

‘इन्सॅट- ३ डीएस’ उपग्रह

  • वजन : २२७४ किलो

  • जमीन आणि सागरी पृष्ठभागाचे निरीक्षण व अभ्यास

  • वातावरणाचा अंदाज नैसर्गिक आपत्तीचा पूर्व इशारा देणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com