

Police investigation underway at the residence in Banda district where a woman died accidentally while filming an Instagram reel stunt.
esakal
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी रील बनवणाचे वेड अनेकांना आहे, यातून बऱ्याच लोकांचे नशीब उजाडले असले तरी कित्येक लोकांच्या हाती निराशा आली आहे तर काहींना रीलच्या नादात जीव गमवावे लागले आहेत. यामुळे सोशल मीडियाच्या वापरावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नुकताच उत्तर प्रदेशात रील बनवण्याच्या प्रयत्नात एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.